महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेरच्या अध्यक्षपदी काटे तर सचिव पदी वाणी
रजनीकांत पाटील अमळनेर
अमळनेर : येथील मंगळग्रह मंदिरात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला उत्तर महाराष्ट्र विभागाचे राज्य संघटक डिंगबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमळनेर चे अध्यक्ष चंद्रकांत काटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीत दि ६ जानेवारीच्या पत्रकार दिना निमित्त चे नियोजन करण्यात आले व इतर विषयांवर चर्चा करत अध्यक्ष चंद्रकांत काटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली.यात उपाध्यक्षपदी -विजय गाढे,मिलिंद पाटील,सचिव-भटेश्वर वाणी,सह सचिव-जितेंद्र पाटील,खजिनदार-ईश्वर महाजन,संघटक-गौतम बिऱ्हाडे,व कार्यकारिणी सदस्य म्हणून जयंतीलाल वानखेडे,अजय भामरे,संजय मरसाळे,समाधान मैराळे,नूर खान,राहुल पाटील गुरनामल बठेजा तर सल्लागार म्हणून डिगंबर महाले सर,पांडुरंग पाटील,प्रा जयश्री दाभाडे,उमेश धनराळे,विवेक अहिरराव यांची निवड करण्यात आली.यावेळी बैठकीला पत्रकार सुनील करंदीकर,सचिन चव्हाण,काशिनाथ चौधरी,मनोज चित्ते,महेंद्र पाटील,सुखदेव ठाकूर,राहुल पाटील,प्रसाद जोशी,रोहित बठेजा आदी उपस्थित होते.






