नागरी हीत दक्षता समितीच्या आंदोलनाला यश
रजनीकांत पाटिल अमळनेर
अमळनेर : लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय सौ पुष्पालता ताई साहेब राव पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड यांनी नपा सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शनसाठी 36 लाख रुपयांचा चेक नागरी दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला व सर्व थकीत रक्कम मार्च 2021 पर्यंत देण्याचे मान्य केले सदर बैठक माननीय मुख्याधिकारी नपा यांच्या बंगल्यावर पार पडली
दिनांक 24 डिसेंबर 20 रोजी आयोजित केलेले लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आले आहे असे समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी जाहीर केले याप्रसंगी श्री संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, सत्तार मास्टर, श्रावण गुरुजी, ग का सोनवणे, हमीद गुरुजी, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, श्री जोशी, श्री ठाकरे, व विक्रांत पाटील या प्रसंगी उपस्थित होते.
थकित पेन्शनच्या प्रश्नासाठी माननीय आमदार श्री अनिल भाईदास पाटील ,सर्व पत्रकारांनी सहकार्य केल्याबद्दल पत्रकारांचे व सर्व शिक्षकांचे समितीने आभार मानले आहेत.






