Amalner

? अमळनेर येथे तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा जनांदोलनाची भूमिका घेऊ…मा.आमदार श्री शिरिषदादा चौधरी

अमळनेर येथे तात्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा जनांदोलनाची भूमिका घेऊ…मा.आमदार श्री शिरिषदादा चौधरी

अमळनेर:-येथील अमळनेर तालुक्यात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असून शासनाचे सीसीआय/कॉटन फेडरेशन(कापूस खरेदी )सुरू नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत आहे.जिल्ह्यातील बहुदा सर्वच तालुक्यामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याचे समजते.फक्त अमळनेर येथेच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने अमळनेरचा भूमिपुत्र,शेतकरी वर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असतांना दिसत आहे.

कापूस उत्पादनांत अमळनेर तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर असून देखील राजकीय दबावापोटी सदर केंद्र सुरू होत नसल्याने भूमिपुत्र, शेतकरीबांधवात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.त्या अनुषंगाने तात्काळ कापूस खरेदी सिसिआय अथवा कापूस फेडरेशन मार्फत खरेदी सुरू करावी अन्यथा शेतकरी हितार्थ जनांदोलन करू अश्या आशयाचे निवेदन मा. जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत व पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या मा. आमदार श्री शिरिषदादा चौधरी नि केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button