?ओ मनी माय मानेल पोर नाचसं “सायब्या” ना तालवर..नाच री कठपुतली..तेरी डोरी बांधी राज..भवन के हाथँ…!
अमळनेर येथील नगरपरिषदेचा मनमानी कारभार जनतेच्या लक्षात येऊ लागला आहे. अमळनेर नगरपरिषदेचे कार्यालय हे सध्या धुळे रोडवरील राजभवन येथे आहे. इमारत जरी प्रत्यक्षात स्टेशन रोड वर असली तरी सूत्रे सर्व राज भवनातून हलत असतात.अमळनेर अधिकाऱ्यांना स्वतः च स्वतंत्र अस्तित्व आहे हे स्वतः च विसरून गेले आहेत.त्यामुळे ह्या मानस कन्या मानलेल्या बापाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत.ह्या सर्व प्रक्रियेत आजूबाजूचे चार पाच कर्मचारी,ठेकेदार इ नी मस्तच सावळा गोंधळ न पा त माजवून ठेवला आहे. प्रशासकीय निर्णय घेणे हे सर्वस्वी मुख्याधिकारी यांच्या वर अवलंबून असतात हे अमळनेर मुख्याधिकारी विसरले आहेत.सर्वच निर्णय हे राजभवनातून घेतले जात असल्याने जनतेनेत संभ्रम निर्माण झाला आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या वास्तूची गरज आहे का? असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे. सर्व आर्थिक फायद्याचे राजकारण केले जात असून लोक हित बाजूला ठेवले जात आहे. लोक हितासाठी विकासाच्या नावाखाली पक्ष बदलणारे आता मात्र स्वतःची तुंबडी भरण्यात मग्न आहेत अशी चर्चा गावात जोरदार पणे सुरू आहे.
त्यातच इमानदार उप मुख्याधिकारी यांना काम करताना प्रशासकीय अडचणी निर्माण केल्या आहेत त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला आहे.आमच्या सेटिंग मध्ये बसत नाही मग सेट च्या बाहेर राहायचं असा प्रकार अमळनेर नगरपालिकेच्या बाबतीत राजरोस पणे होताना दिसून येत आहे. सेटिंग च्या परिक्षेत्रात येणारेच फक्त विचारात घेतले जातात.भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातलं जातं.. उघड पणे वरद हस्त ठेवला जातो ही सर्व कशाची मुजोरी आहे हे विचारण्याची वेळ आली आहे. जनतेने निवडून दिल आहे..अधिकारी म्हणून तुमचं काम आहे जनतेला सेवा देणं याऐवजी आर्थिक स्वार्थासाठी सर्वच चोर एकत्र आल्याचा घृणास्पद प्रकार गजानन महाराज्यांच्या छत्र छायेत केला जात आहे. पण एक मात्र नक्की जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं गेलं आहे आणि आता हे सर्व प्रकार हळूहळू उघडकीस येत आहेत अजून काही प्रकार उघडकीस येणार आहेत.
क्रमशः….






