अमळनेर येथे हजरत बाबा ताज फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन
अमळनेर येथील हजरत बाबा ताज फाऊंडेशनच्या वतीने दिनांक १३ डिसेंबर २०२० रविवार रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत एक दिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन डाँ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे मोफत आयोजित करण्यात आले आहे.
हजरत बाबा ताज फाऊंडेशनच्या तर्फे आयोजित आरोग्य शिबिरात डोळे आणि अस्थिरोग तपासणी करण्यात येणार आहे डोळे तपासणी च्या वेळी जर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रियाची गरज पडल्यावर त्या रुग्णाच्या शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येणार आहे या शिबिरासाठी गोदावरी हास्पिटल ची टीम तर अस्थिरोग साठी अमळनेर येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डाँ सुमित सुर्यवंशी आणि शहरातील डाँ रईस बागवान, डाँ ऐजाज रंगरेज,डाँ युसुफ पटेल,डाँ इमरान अली शहा,डाँ इम्रान कुरैशी,डाँ फिरोज शेख, डाँ फयाज नुरी,डाँ फहरीन बी, सह आदि आरोग्याची टीम उपस्थित राहणार आहेत शिबिरात नाव नोंदणी साठी शहरातील १] जमाली मेडिकल,( गांधलीपुरा ) २] इंडियन मेडिकल,( दगडी दरवाजा जवळील ) ३] युनिक मेडिकल,( कसाली मोहल्ला डाँ बागवान शेजारी ) ४] राँयल मेडिकल, ( झामी चौक ) याठिकाणी संपर्क साधावा तरि या आरोग्य शिबिरात शहरातील जास्तीत जास्त गोरगरीब गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हजरत बाबा ताज फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.






