भक्तांना राहण्यासाठी समुदाय भवन निर्माण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली…
महेश हुलसूरकर हुलसुर
Karnatak : हुलसूर तालुक्यातील बेलुर येथील असलेल्या दलित शरण उरलिंगपेद्दी या मठाला महाराष्ट्र कर्नाटक व आंध्रा येथून भाविक भक्तगण येत असतात त्यांना राहण्यासाठी मठाच्या परिसरात भव्य समुदाय भवन निर्माण करण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करावी अशी मागणी मठाचे पीठाधीपती पुज्य श्री गुरु पंचाक्षरी स्वामी व बिदर जिल्हायाचे लाडके नेते सुर्यकांत नागमारपल्ली यांनी बेंगळुरू येथे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडिरप्पा याची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी मुख्यमंत्री राज्यात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने सध्या आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणूक झाल्यानंतर मंजुरी देवु असे आश्वासन दिले आहे.






