युरोप कडून राजवडच्या पटेल दाम्पत्यांना डॉक्टरेट उपाधी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
कमलेश चौधरी पारोळा
Parola : मुख्याध्यापिका पाकीजा उस्मान पटेल व उस्मान फकीरा पटेल माध्यमिक शिक्षक यांना युरोपच्या संस्थेने डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले
युरोपची संस्था युरोपीय रोमन अध्ययन आणि अनुसंधान संस्थान चे चेअरमन प्रोफेसर डॉ. बजराम हालीटी यांनी मानवता आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याने डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानीत केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे
जनकल्याण, सामाजिक व शैक्षणिक कार्य केल्याने पटेल दांपत्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार बहाल झाले आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून पर्यावरण ,महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, मुलींचे शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता व सामाजिक क्षेत्रातील योगदान तसेच कोरोना काळातील जनजागृती, मुलांचे ऑनलाईन शिक्षण, विविध शैक्षणिक साहित्य व गरजू वस्तूंचे वाटप केल्याने त्यांना डॉक्टरेट उपाधी प्रदान करण्यात आली या यशस्वीतेसाठी डॉ.शेख जाकीर मोहम्मद साहेब यांचे योगदान लाभले.या डॉक्टरेट उपाधीने पटेल दाम्पत्यांनी राजवड आदर्श गावाचे नाव जगाच्या नकाशावर अभिमानाने उमटविले आहे या यशाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






