Amalner

? Breaking News..वाळू माफियांची वाढती मुजोरी..चक्क तहसील कार्यालयातून जप्त वाहनांच्या चाकांची चोरी..

? Breaking News..वाळू माफियांची वाढती मुजोरी..चक्क तहसील कार्यालयातून जप्त वाहनांच्या चाकांची चोरी..

अमळनेर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसील कार्यालयात अवैध रेती वाहतूक करणारे रिक्षा आणि ट्रॅकटर जमा करण्यात आले आहेत.यासंबंधीच्या दंड भरण्याच्या सूचना संबधीत वाहन चालकांना देण्यात आल्या होत्या. परंतु मध्यंतरी दीपावलीच्या सुट्ट्या असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात शांतता होती. दि 13 नोव्हेंबर रोजी मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ हे दिवाळीच्या सुट्टी साठी बाहेर गावी गेले आणि त्याच रात्री जवळजवळ 10 गाड्यांचे चाके चोरून नेण्यात आले आहेत. या बाबतीत अमळनेर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला असून तहसील आवारातील cctv फुटेज पहिल्या नंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.

अमळनेर शहरात वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक छोटे छोटे टेम्पो,ट्रॅकटर दिवसरात्र वाळू उपसा करून पर्यावरणास हानी पोचवत आहेत.विशेष म्हणजे या सर्व अवैध धंदे करणाऱ्या स्वतःला गुंड म्हणवून घेणाऱ्यांवर कोणाचाही धाक राहिलेला नाही.याबतीत शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button