Big Breaking.. मारवड पोलिसांची धडक कार्यवाही…कलाली येथील हातभट्टी चा अड्डा केला उद्धवस्त…
अमळनेर येथील मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलाली येथील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर मारवड पोलीसांनी धाड टाकून अड्डा उध्वस्त केला.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की सहायक
पोलिस निरीक्षक राहुल फुला यांना मिळालेल्या माहिती वरून कलाली येथील ज्ञानेश्वर सुखदेव कोळी हा त्याच्या भावाच्या नावे तापी नदी काठी असलेल्या गट न २३० या शेतात हातभट्टी द्वारे गावठी दारू तयार करतांना आढळून आला असून मारवड पोलिसांनी त्याच्याकडून
सुमारे ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास सुखदेव कोळी हा कलाली येथील गट न २३० लोंढे नाल्याशेजारील शेतात हातभट्टी वरील दारू तयार करताना आढळून आला असून त्याच्या कडून मारवड पोलिसांनी सुमारे ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला असून याबाबत मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






