?️ संतापजनक…पारोळा येथील तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अपहरण आणि सामूहिक बलात्कार… तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी…जिल्ह्यात संतापजनक खळबळ..
रजनीकांत पाटील
पारोळा येथील टोळी या गावाजवळ 20 वर्षीय तरुणीवर अपहरण करून सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.पिडीत तरुणीला अपहरण करून गुंगीचे औषध देण्यात आले होते. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला जबर मारहाण करण्यात आली व जखमी अवस्थेत बस स्थानकाच्या मागील बाजूस फेकून देण्यात आले होते. तिच्यावर विष प्रयोग देखील करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात तरुणीचे मामाने मंगळवारी फिर्याद दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की साने गुरुजी कॉलनी परिसरात राहणारे तरुणीचे मामा यांची दोन क्रमांकाची बहीण टोळी ता. पारोळा येथे
राहते. बहिणीला तीन मुली व दोन मुले आहेत. त्यातील क्र.2 ची मुलगी ही
पारोळा शहरातील आर. एल. महाविद्यालयात विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात
पदवीचे शिक्षण घेत आहे. ३ नोव्हेंबर रोजी भाची मामा कडे राहण्यास आली
होती. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मामा हे बाजारात गेले
होते. दुपारी तीन वाजता घरी आले, त्यावेळी भाची घरात दिसली नाही म्हणून त्यांनी
शोध घेतला ती सापडली नाही म्हणून ८ नोव्हेंबरला भाची बेपत्ता झाल्याची पारोळा पोलीस स्टेशनला नोंदवली. त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्यांना समजले की पारोळा कुटीर रुग्णालयात एका तरुणीस विषबाधा झाल्यामुळे दाखल केले आहे. त्यामुळे ते खात्री करण्यासाठी कुटीर रुग्णालयात गेले व तेथे उपचार घेत
असलेल्या भाचीस ओळखले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
रुग्णवाहिकेतुन नेत असताना भाचीला शुद्ध आली. त्यावेळी तिने फिर्यादी मामा, तिची आई व मोठी बहिण यांना घटना सांगितली. टोळी येथील शिवानंद शालिक
पवार हा मैत्री करण्यासाठी फोन करण्याचा सारखा इशारा करीत असे. पण तिने
लक्ष न दिल्याने शिवनंदन शालीक पवार, पप्पू अशोक पाटील, अशोक
वालजी पाटील यांनी तिच्यावर अतिप्रसंग करून सामूहिक बलात्कार केला
आहे. तसेच पारोळा येथून अपहरण करून गुंगीचे औषध देत कासोदा गावाच्या
जवळ अज्ञात ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्यास विरोध
केला असता तिघांनी व एक अज्ञात महिलेने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून
शिवीगाळ करीत, आम्ही सांगू तसे वाग, नाहीतर तुला मारून टाकू.
अशी दमदाटी केली होती. यामुळे तरुणीच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असल्याचे तिने मामा व आईला सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे तिच्यावर धुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.
मंगळवारी पहाटे उपचार घेत असताना तिची ही झुंज संपली असून प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे पारोळा शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोषी संशयित आरोपींना अटक करून
कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत असून काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी शिवनंदन शालीक पवार व अशोक वालजी पाटील या संशयितांना ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करीत आहे. तसेच शिवनंदन पवार याने
सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच्यावर धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तेथे सुद्धा
पोलिस बंदोबस्त ठेवलेला आहे. या प्रकरणी लवकरच दोषींना अटक करून
त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.






