परतीच्या पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावला
हुलसूर/प्रतिनिधी -महेश हुलसूरकर
हुलसूर येथील प्रगतीशील शेतकरी श्रीमंतराव जानबा यांच्या शेतातील सहा एकरात लावलेला परतीच्या पावसाने पूर्णपणे आडवा पडला आहे लेकरासारखे दिवस रात्र पाणी देवुन दोन ते तीन वेळेस खुरपणी करून बहारदार पंधरा ते वीस खांडी ऊस आलेला डोळ्यासमोर पुर्ण पणे एका रात्रीत भुईसपाट झाल्याने भावुक झालेले दिसत होते व त्यातच रात्री पंधरा दिवसा खाली दुभती गाय ऐवलेली अचानक साप चावल्याने मेल्याने दुहेरी संकट आल्याने एकीकडे तोडणीला आलेला ऊस व दुसरीकडे दुभती गाय गेल्याने हातबल झालेले आहे .
सुमारे हुलसूर परिसरात हजारो हेक्टर परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे शेतातील सोयाबीन काढून ठेवलेले पाण्यामध्ये वाहून गेले तर काही जण गंजी लावून ठेवलेल्या गंजीवरील ताडपत्री फाटुन पाणी गेल्याने नुसता चिखल झालेल्या आहेत लवकरात लवकर प्रशासनाने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावे अशी मागणी करीत आहेत.






