आरोग्य दूत विक्की खोकरे यांना शाहू फुले,आंबेडकर पुरस्कार जाहीर…
रजनीकांत पाटील
एरंडोल – राज्यात विविध क्षेत्रात काम करून समाजासाठी झटणाऱ्या संस्थां व समाजसेवक यांचा कार्याची दखल घेत पुणे येथील शाहू फुले बहुउद्देशीय संस्था तर्फे शाहू, फुले,आंबेडकर पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात येणार आहे
यात एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी केलेले सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल यांना देखील सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
विक्की खोकरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे आमदार चिमणराव पाटील नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी, शालिकभाऊ गायकवाड,रमेश अण्णा महाजन, किशोरभाऊ निंबाळकर, प्रा आर एस पाटील, अॅड मोहन शुक्ला ,अॅड विलास मोरे, दिलीप पवार, बिरजू भाऊ सिरसे सामाजिक कार्यकर्ते छोटु भगत, नगरसेवक कुणाल महाजन, सामाजिक कार्यकर्ते परेश बिर्ला, युवा शहर अध्यक्ष अतुल महाजन,मुन्ना देशपांडे आदींनी अभिनंदन केले






