Amalner

मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन तर्फे अमळनेरचे आमदार अनिलदादा पाटील यांना घेराव 10 टक्के आरक्षणा सोबतच इतर मागण्यांचे दिले निवेदन

मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन तर्फे अमळनेरचे आमदार अनिलदादा पाटील यांना घेराव
10 टक्के आरक्षणा सोबतच इतर मागण्यांचे दिले निवेदन

अमळनेर /प्रतिनिधी- महेंद्र साळुंके

महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची राजकिय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे त्या वर आधारित 10% आरक्षण शिक्षण अणि नौकरी मध्ये देण्यात यावे या प्रमुख मागणिकरिता मुस्लिम निर्णायक आंदोलन तर्फे अमळनेर विधानसभेचे आमदार अनिलदादा पाटील यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले यावेळी आमदार अनिल दादा यांनी आश्वासन दिले की येणाऱ्या अधिवेशनात तुमचे प्रश्न निश्चितच मांडू निवेदनात पुढील 5 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

1) महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पहाता मुस्लिम समाजास संवैधानिक कायदा करून 10 % आरक्षण देण्यात यावे.
2)आमचे बंधू मराठा समाजा बरोबर मुस्लिम आरक्षण साठी पण अध्यादेश काढावा.
3)2020 पासून पुढे होणार्या सर्व शैक्षणिक संस्था मधील ऐडमिशन मध्ये 10%जागा मुस्लिम समाजाला देण्यात याव्यात.
4))2020 पासुन पुढे होणाच्या सर्व नोकरी मध्ये 10% जागा मुस्लिम समाजास सोडाव्यात देण्यात याव्यात.
5)मुस्लिमांवर होणारे हल्ले, माबलिंचिंग च्या गंभीर घटना, यांना आळा घालण्यासाठी
मुस्लिम समाजाला अॅक्ट्रासिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे. तसेच देशात माबलिंचिंग विरोधी कठोर कारवाई साठी संरक्षण कायदा करण्यात यावा.

याआधी आम्ही 7 सप्टेंबर 2020 रोजी मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन च्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात OTP आंदोलन केले होते. त्या आंदोलनात महाराष्ट्रात जवळपास 200 पेक्षा जास्त तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात 10%मुस्लिम आरक्षण साठी एकाच दिवशी एकाच वेळी निवेदन देण्यात आली होती. परंतु त्याची दखल शासनाने घेतली नाही. म्हणून आता 21 ते 30 सप्टेंबर2020 दरम्यान जनप्रतिनिधि घेराव च्या माध्यमातून पुन्हा एकदा निवेदन देत आहोत.

तरी आपण ज्या पार्टी पक्ष कडून निवडणूक जिंकलेले उमेदवार आहात त्या पार्टी पक्षाच्या अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांन मुस्लिम आरक्षण विषयी मौन सोडून 10%मुस्लिम आरक्षण देण्यासाठी योग्य निर्णय घेण्यास भाग पडावे. अन्यथा 1 ऑक्टोबर 2020 पासून सर्व मुस्लिम समाज रस्त्यावर उतरुन व तीव्र आणि विशाल जन आंन्दोलन उभे करणार आहे . त्यानंतर महाराष्ट्रात जे काही घडेल याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनची असेल. कारण आता समाजाची सहनशीलता संपली आहे. याची कृपया नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नविद शेख, अशपाक शेख, गुलाम नबी, अहेमद अली, जमाल शेख, मझहर शेख, अॅड.साजीद शेख, अमजद अली, जाविद पेंटर, ईमरान टेलर, असलम पठान, फैजान शेख, वसीम पठान सह आदि उपस्थिति होती..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button