Amalner

? माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने  कर्मचारी, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांना  वाटले 100 SWASA मास्क..

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने कर्मचारी, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांना वाटले 100 SWASA मास्क..प्रा जयश्री दाभाडेअमळनेर येथे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने सरकारी अधिकारी कर्मचारी,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना SWASA कंपनीचे 100 मास्क मोफत वाटप केले. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्वतः ची आणि एकमेकांची काळजी घेणे आवश्यक आहे. आता तर मास्क वापरणे,सॅनिटायझर उपयोगात आणणे हे इतके महत्वपूर्ण झाले आहे आणि अंगवळणी देखील पडले आहे. दिवसेंदिवस जरी कोरोनाची भीती कमी होत असली तरी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा हे पहिल्या पासूनच आपल्या वेगळ्या शैलीने आणि दानशूर व्यक्तिमत्वामुळे सतत विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवित आहेत.? माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने  कर्मचारी, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांना  वाटले 100 SWASA मास्क..सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांना रुमाल,छत्री,सॅनिटायझर च्या बाटल्या इ वाटप केले आहे. एव्हढेच नव्हे तर लॉक डाऊन च्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यात जेवणाचीही व्यवस्था त्यांनी स्वखर्चाने केली आहे. अनेक गरजू आणि गरीब लोकां पर्यंत त्यांनी आपल्या वेगळ्या खास शैलीत मदत पोहचविली आहे.आणि आता त्यांनी अमळनेर शहरातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते जे सतत कोरोना काळात कार्यरत आहेत आणि काम करत आहेत अश्या सर्वांना SWASA कंपनी चे मास्क वाटप केले आहेत. सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button