Amalner

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र संघटक पदी डिगंबर महाले

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र संघटक पदी डिगंबर महाले

अमळनेर-रजनीकांत पाटील

येथील जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले (लोकमत) यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्यसंघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी – २०२० जाहीर झाली. त्यात श्री. महाले यांच्यावर संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. व्यक्तिशः श्री. महाले यांच्यासह अमळनेरला यानिमित्ताने मोठा बहुमान मिळाला आहे. या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी श्री. महाले यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button