Amalner

सेवा सप्ताह अंतर्गत चौबारीत आरोग्य किटचे वाटप ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि महाएनजीओ फेडरेशनचा उपक्रम

सेवा सप्ताह अंतर्गत चौबारीत आरोग्य किटचे वाटप
ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि महाएनजीओ फेडरेशनचा उपक्रम

अमळनेर महेंद्र साळुंके

आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित महा एनजीओ फेडरेशन, पुणे आणि ज्ञानवर्धिनी फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सप्ताह निमित्त ३० सप्टेंबर रोजी अमळनेर तालुक्यातील चौबारी गावात कोरोना प्रथमोपचार आरोग्य किटचे वाटप करुन लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पंडित दीनदयाल उपाध्याय व महात्मा गांधी जयंती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महा एनजीओ फेडरेशनतर्फे दि. १४ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त चौबारी येथील गरीब व गरजू सुमारे १७८ लाभार्थ्यांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गरीबांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी लाभार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क, आर्सेनिक अल्बम आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. शिवाय कोरोनाचे संक्रमण कसे पसरते आणि त्यापासून स्वत:चे आणि कुटुंबाचे कसे संरक्षण करावे, याबाबत ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे सचिव सोपान भवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावाच्या पोलीस पाटील भावना पाटील यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवित उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदस्या अनिता मोरे, सचिन अहिरे, आशा सेविका मिनाबाई पाटील यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button