Pune

हाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी- वंचित बहुजन आघाडीची मागणी

हाथरस सामुहिक बलात्कारातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी- वंचित बहुजन आघाडीची मागणी

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:हाथरस (उत्तर प्रदेश) येथील झालेल्या सामूहिक बलात्कारातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी यासाठी इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले .हे निवेदन इंदापूर तहसील कार्यालय येथे नायब तहसिलदार शुभांगी अभंगराव यांना देण्यात आले .

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चांदवड परिसरातील एका गावातील १९ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर तिच्यावर दिल्ली येथील समदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र ती दुर्दैवाने वाचू शकली नाही.पीडित मुलीची जीप कापल्याने ती बोलू शकली नाही परंतु तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देते वेळी वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कांबळे,बापूसाहेब साबळे,पवन राजु पवार, दत्तात्रय घोडके, संजय चंदनशिवे, सुनील गायकवाड,प्रमोद चव्हाण,राहुल सोनवणे, सागर लोंढे,विकी जगताप, विकास गायकवाड,प्रल्हाद बोबडे आधी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button