हुतात्मा नाग्या कातकरी यांना वडेश्वर येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने अभिवादन
मावळ प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
वडेश्वर येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृती दिना निमीत्ताने बिरसा क्रांती दल यांच्या वतीने हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
आदिवासी समाजासाठी हुतात्मा नाग्या कातकरी यांनी मोठे योगदान दिले आहे त्यामुळे आदिवासी क्रांतीकारक म्हणून हुतात्मा नाग्या कातकरी यांना संपुर्ण देशभर ओळखले जाते. ते हुतात्मा नाग्या बाबाचे कार्य आदिवासीसाठी क्रांतीची लढाई होती. असे मत बिकेडी चे पुणे जिल्हा संघटक विक्रम हेमाडे यांनी माडले.
त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे पुणे जिल्हा संघटक विक्रम हेमाडे, मावळ तालुका संघटक सुरेश कशाळे, मार्गदर्शक रामदास गभाले, वडेश्वरचे संतोष गभाले, माजी ग्रामपंचायत सदस्य छगन लष्करी, काळू पवार, सुभाष वाघमारे, सुनिल लोटे, पुप्पू हेमाडे उपस्तीत होते.






