दहिवद येथे जपानची मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीचा प्रयोग..ग्रामपंचायतीमार्फत १००० देशी वृक्षांची लागवड
अमळनेर :- जपान या देशात मियावाकी पध्दतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जाते. यामध्ये वृक्षांची आपापसामध्ये स्पर्धा आणि त्यांचे एकमेकांशी असलेल्या मैत्रीच्या नात्याला प्रोत्साहन दिले जाते.
त्याचप्रमाणे अमळनेर तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतीमार्फत मियावाकी प्रकल्पासाठी ओसाड जमिनीची निवड करून तेथील मूळ निकृष्ट दर्जाची माती काढून तेथे शेणखत, पालापाचोळा, तांबडी माती, काळी माती व गाळ यांचा समप्रमानात मिसळून त्यांवर खड्डे करून एक हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर जि.प सदस्या जयश्री अनिल पाटील, विस्तार अधिकारी सुधीर पाटील, मा. जि.प सदस्य ऐ.टी पाटील, सुभाष देसले, हिरालाल पाटील, दादा कुमावत, प्रविण माळी, लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, बचत गट महिलावर्ग,पोलिस पाटील, लिपीक, रोजगारसेवक, कोतवाल, वृक्षमित्र, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग व तमाम ग्रामस्थ उपस्थित होते.






