जामखंडी पुलाला जिल्हाधिकारी याची तात्काळ भेट
प्रतिनिधी-महेश हुलसूरकर
हुलसूर पासून जवळच असलेल्या भाल्की तालुक्यातील जामखंडी पुलामध्ये दि. १८ रोजी प्रकाशित झालेल्या ठोस प्रहार पेपर मध्ये बातमी पुराच्या पाण्यात ट्रक वाहून गेला बातमी पाहून दि. २१ रोजी सांयकाळी पुलाची पाहणी करून लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देत लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करण्याचे सांगितले.
व हुलसूर येथील कामशेट्टे तळे फुटून २०० हेक्टर पेक्षा जास्त शेत पाण्याखाली गेलेले आहेत ते त्या शेतकर्यांना भूमापन विभाग व तलाठी यांना शेताची पाणी फोटो द्यावे व त्या सर्व शेतकऱ्यांना लूकसान भरपाई ताबडतोब देण्याची जबाबदारी घेतली त्यानंतर वार्ड क्रमांक एक मधील रस्त्याच्या बाजूला मोठे नाली बांधकाम चे आदेश दिले नवीन हुलसूर तालुका झाल्याने येथे मीनि विधानसभा अनिल भुसारे याची जागाही पाहणी केली तसेच जुनी बसस्थानक ही पाहणी केली.
माजी जि.पं.अध्यक्ष अनिल भुसारे यांनी मेमडम एकरी पंचवीस हजार रुपये लुकसान भरपाई द्यावी म्हणून मेमडम जिल्हाधिकारी आर.रामचंद्रण याना दिले.
यावेळी उपस्थित तहसीलदार सावित्री सलगर, जि.पं.सदस्य सुधीर काडादी, माजी जि.पं.अध्यक्ष अनिल भुसारे, माजी जि.पं.उपअध्यक्ष लता हारकुडे, ता.पं.सदस्य गोविंदराव सोमवंशी, भूमापन अधिकारी मौनेश, गावातील प्रमुख उपस्थित होते.






