Parola

बहादरपूर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड….मुद्देमालासह दोघांना केली अटक, तीन फरार

बहादरपूर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड….मुद्देमालासह दोघांना केली अटक, तीन फरार

रजनीकांत पाटील

पारोळा – तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीपात्रात पत्ता जुगारावर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत रोख रकमेसह ४४ हजारांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. तीन जण मात्र पसार झाले.

निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या आदेशानुसार हवालदार रवींद्र रावते, विजयसिंह शिंदे, रवींद्र पाटील यांनी बोरी नदीपात्रात सबस्टेशनमागे सुरू असलेल्या छापा टाकला. त्यात रोख मारला असता त्याठिकाणी रोख रक्कम, दोन मोबाइल व एका दुचाकीसह ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. मोहसीन खान यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र भोई, आसाराम भोई, गोपाळ भोई व दोन पसार अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button