पिंप्री बुद्रूकला तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
रजनीकांत पाटील
प्रतिनिधी एरंडोल ::> तालुक्यातील पिंप्री बुद्रूक येथील भगवान काशीनाथ पाटील (वय ३०) या तरूण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पिंप्री बुद्रूक येथील पोलिस पाटील सूर्यकांत पाटील हे शेतातून घरी जात होते. यावेळी भगवान पाटील यांची आई मिराबाई काशीनाथ पाटील शेतामध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास रडताना दिसल्या. त्यांना विचारल्यावर मुलगा भगवान आमच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचा मृतदेह पाण्यात पडल्याचे सांगितले.
यानंतर सूर्यकांत पाटील यांनी घटनास्थळी जावून खात्री केली. या घटनेची माहिती एरंडोल पोलिस ठाण्यात दिली. मात्र, भगवानच्या आत्महत्येचे कारण समोर आले नाही. मृत भगवान पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तपास काशीनाथ पाटील करत आहेत.






