हिंदू मुस्लिमांचे श्रध्दा स्थान असलेल्या हजरत जिन्दा शहा मदार शहा बाबांच्या जुन्या दर्ग्याला रेल्वे प्रशासनाने दिली नोटीस…मुस्लिम युथ फाउंडेशनचे प्रशासनाला निवेदन…
महेंद्र साळुंके
अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील बंगाली फाईल येथे हिंदू मुस्लिमांचे श्रध्दा स्थान असलेल्या हजरत जिन्दा शहा मदार शहा बाबाची शेकडो वर्षे जुनी दर्गा आहे रेल्वे प्रशासनाने कोणत्याही आदेश व नोटीस ना देता सदरील दर्ग्याच्या छोटे स्वरूपाचे बांधकाम तोडीत असलेल्यांवर तातडीने कारवाई करावी असे मागणीचे लेखी निवेदनाद्वारे मा मुख्यमंत्री महोदय रेल्वे मंत्री भारत सरकार न्यु दिल्ली म डि आर एम सेन्ट्रल रेल्वे मुंबई व जिल्हाधिकारी जळगांव प्रांत अधिकारी आणि अमळनेर रेल्वे मंडळ विभागाचे अभियंता यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे.
मुस्लिम युथ सेवा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही वर नमूद ठिकाणी जन्मापासून वास्तव्य करत असुन मुस्लिम धर्माचे पाईक आहोत आम्ही आमच्या परिसरात गेल्या १३० वर्षा पूर्वीपासून असलेल्या जिन्दा शहा मदार शहा बाबा यांचे भक्ती भावनांचे स्थान असुन आम्ही तेथे उपासना करतो आमच्या जाती जमाती लोक व इतर धर्माचे लोक आठवड्यातून दर गुरुवारी सदर दर्गा वर फातेहा वाचण्यास येथे नमूद परिसरात छोटेखानी मंदिर देखील आहे आम्ही सर्व धर्मीय नागरिकांनी मिळून सदरील छोटेखानी असलेल्या मंदिर बदल करून मोठ्या स्वरूपात बांधकाम करून सर्व जाती धर्माच्या लोकांनी बांधलेले आहे पूर्वी जिन्दा शहा मदार शहा बाबा यांची दर्गा चे चबूतरा १२ × १५ आकार अवस्थेत होते ते जीर्ण व जुने बांधकाम असलेल्या सिमेंट पत्राचे शेड होते आम्ही गावातील सर्व जाती धर्माच्या लोक व मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन मिळून दर्गा चे बांधकाम करित आहे सदरील दर्ग्याच्या बांधकाम रेल्वे प्रशासन तोडत आहे रेल्वे प्रशासनावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनावर फाउंडेशनच्या अध्यक्ष रियाज शेख, नगरसेवक फिरोज मिस्त्री, सामाजिक कार्यकर्ते भरत पवार, अँड शकिल काझी, अँड सलीम खान, अख्तर अली सैय्यद, साबिर पठान, कमालोदीन शेख, इकबाल शहा सह आदि चे स्वाक्षऱ्या निवेदनावर आहे.






