शिक्षण विभागाचे दुर्लक्ष …. शाळा खोल्यान अभावी भरते मंदिरात
आदिवासी व आती दुर्गम भागाकडे जाणिव पुर्वक दुर्लक्षअकोले प्रतिनिधी :- विठ्ठल खाडेअकोले – भंडारदरा गावात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे मात्र वर्ग खोल्या जुन्या झालेल्याने दोन वर्षां पुर्वी निर्लेखन करुन सदरील इमारत पाडण्यात आली आहे तर प्रशासनाने आदिवासी भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा या शाळेकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. तर सदरील शाळा वर्ग कमी असल्यामुळे मंदिरात भरत आहेत मात्र या ठिकाणी शौचालय, बाथरुम, नसल्याने मुलांना मोठा त्रास सहन करावालागतोय अद्याप जे वर्ग चांगले होते त्यास प्रशासनाने ग्रामपंचायत ला नोटीस देऊन ते वर्ग पाडण्यास सांगितले नंतर सहा महिन्यांत निधी देतो असे सांगून सुद्धा आज दोन वर्षांपासून शासनाचा कोणताही निधी प्राप्त झाला नाही.तसेच शाळा पाडल्यापासून दोन ते अडीच वर्षांपासून शाळा मंदिरात भरत आहे. मंदिरात दोन वर्ग भरवण्यात येत आहेत तर एक वर्ग ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत भरत आहे व अंगणवाडी ही अतिशय खराब असून कोणत्याही क्षणी कोसळू शकते.तसेच अंगणवाडीतील छोट्या विद्यार्थांना बसण्याची कोणतीही सोय नसल्याकारणाने गावकऱ्यांनी अंगणवाडीची व्यवस्था एका घरात केली आहे. त्यामुळे छोट्या मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. एकात्मिक बाल विकास अधिकारी यांना निरलेखन केलेल्या अंगणवाडी व शाळेचे दोन वर्गाचां निधी शाळा सुरू होण्यापूर्वी जमा करून शाळेचे काम सुरू झाले नाहीत तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला गावकऱ्यांच्या या तीव्र रोषाला सामोरे जावं लागेल व गावकरी कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तसेच पंचायत समितीच्या समोर उपोषणाला बसतील असे भंडारदरा गावच्या ग्रामस्थांनी सांगितले आहे.






