Akola

कृषी सहाय्यकांचे आजपासून काम बंद आंदोलन… हे तर इंग्रज राजवटीतील अधिकारी :- रोहोकले 

कृषी सहाय्यकांचे आजपासून काम बंद आंदोलन…

हे तर इंग्रज राजवटीतील अधिकारी :- रोहोकले

अकोले (प्रतिनिधी): विठ्ठल खाडे

राहुरी येथील तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान ही वागणूक इंग्रज राजवटीतील अधिकाऱ्यांप्रमाणेच असून संबंधित अधिकाऱ्याची बदली होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी माहिती कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले यांनी दिली.

यासंदर्भातील माहिती अशी की, राहुरी येथील तालुका कृषी कार्यालयात पी. एम. किसान योजनेच्या कामकाजासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यासाठी तालुका संघटनेचे पदाधिकारी गेले होते. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सदस्य सोमनाथ बाचकर यांना तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत कार्यालयाच्या बाहेर जाण्यास सांगितले. या अपमानास्पद घटनेचा कृषी सहाय्यक संघटनेने निषेध केला असून कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळेच कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

क्षेत्रीय स्तरावर काम करत असताना एका कृषि सहाय्यकावर 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सनियंत्रण असते म्हणजेच, दहा पटीने जास्त दबाव राहतो. तरी कृषी सहायक पडेल ते काम करून कृषि विभागाचा कणा ताठ ठेवत असतो. त्याचीच पावती म्हणून कृषि विभागाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तरी ही काही अधिकारी इंग्रज राजवटीतील अधिकाऱ्याप्रमाणे वागणूक देत आहे. आजपासून जिल्हा बंद आंदोलन पुकारत असून तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे बदली झाल्याशिवाय ते स्थगित केले जाणार नाही.
दत्तात्रय केरूभाऊ रोहोकले :- जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटना अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button