मौजे दहिवद बु गावाच्या पूर्वेकडील सोनखेडी शिवारालगत शेतकऱ्यांना शेत रस्ता मिळणे बाबत तहसिलदार यांना दिले निवेदन
अमळनेर रजनीकांत पाटील
अमळनेर तालुक्यातील दहिवद बु.गावाच्या पूर्वेकडील नाल्यावर जलमुक्त शिवारा मार्फत बंधारे बांधल्यामुळे नाल्यातुन जाण्या – येण्याच्या वापरण्यासाठी शेतकऱ्यांचे खुप हाल होत आहेत,त्याचप्रमाणे शेतीचा माल व पिकांसाठी लागणारे रासायनिक खते घेउन जाण्यासाठी बैल गाडीत पाणी येत असल्यामुळे घेऊन जाणे फार कठीण समस्या बनली आहे त्याचप्रमाणे पाण्यात बैलांना झेप लागत असल्यामुळे व रात्र पहाटी नाल्यातुन बैलगाडी ने – आण करणे म्हणजे मुक्या जनावरांचे हाल करून घेणे आहे तरी प्रशासनाने या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देवून शेत रस्ता किंवा जुना वहिवाटीचा रस्ता नकाशा प्रमाणे चौकशी करून मिळून द्यावा अशी मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देताना सुभाष पाटील,दिलीप भदाणे ,दिपक पाटील ,रोहिदास पाटील या शेतकऱ्यांनी दिले आहे
सदर निवेदनावर सुभाष हिम्मत पाटील,रोहिदास शंकर पाटील,दिपक गुलाबराव पाटील,दिलीप दिनकर भदाणे,सुरेश मुरलीधर पाटील,रणजित सुधाकर भदाणे ,देविदास घमन पाटील,प्रकाश दिनकर भदाणे,माणिक हिम्मत भदाणे,राजेंद्र शंकर भदाणे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.






