? Big Breaking…जळगांव महानगरपालिकेचा आंधळं दळत आणि कुत्र पीठ खातंय कारभार…माहिती अधिकारातून दिली जाते चुकीची माहिती..
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष श्री.योगेश मोहन पवार अमळनेर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना टाकलेल्या माहिती अधिकारात जळगांव महानगरपालिका /सर्व नगरपरिषद यांनी दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५% निधी सन २०१९-२० च्या चालू वित्तीय वर्षातील खर्च केलेल्या लाभार्थी ची यादी मिळावी या विषयी दि.३ ऑगस्ट २०२० रोजी माहितीच्या अधिकारात अर्ज सादर केला होता. एक महिन्यानंतर आज दि.३ सप्टेंबर २०२० रोजी जळगांव महानगरपालिका यांच्या कडून अर्जदारास फोन आला व कोणती माहिती पाहिजे अर्जदाराने अर्जात नमूद असलेली माहिती सांगितली. परंतु त्यांनी निवेदन कर्त्यास दिलेल्या माहितीचा अधिकार या माहितीत विचारलेली माहिती न देता जळगांव महानगरपालिका यांच्या सेवेतील दिव्यांग कर्मचारी श्री. संजय सुधाकर जगताप या इसमाची प्रवास भत्ता, लागू असलेली माहिती पाठवली आहे. या इसमाचा व अर्जदाराचा कोणताही संबंध नसतांना तसेच तशी कोणतेही माहिती मागवलेली नसतांना व जी माहिती मागण्यात आली ती न देता चुकीची माहिती दिली जात असल्याचे समोर आले आहे.

यातून एकूणच जळगांव महानगरपालिका क्षेत्रात आंधळं दळत आणि कुत्रं पीठ खात असा प्रकार समोर आला आहे.. या बाबतीत लवकरच आपण वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचे प्रहार अपंग क्रांतीचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी सांगितले आहे.






