ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीने विना विलंब पगार वाढ द्यावी… ग्रामपंचायत कर्मचारी यूनियनने आमदार अनिल पाटील यांना दिले निवेदन…
रजनीकांत पाटील
अमळनेर :- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या पदाधिकारी यांनी तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांना निवेदन दिले आहे. नुकत्याच ऊर्जा व कामगार विभागाने नवीन आदेश पारित केलेले आहेत. त्यात परिमंडळ निहाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार वाढ देणे अपेक्षित आहे. तरी अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी याच्या विना विलंब कार्यवाही करून सदर कर्मचाऱ्यांना झालेली पगारवाढ देण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. आमदार पाटील यांनी या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना पत्र पाठवून तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संघटनेच्या वतीने आमदारांचे आभार मानण्यात आले आहेत. सदर निवेदन देतेवेळी अमळनेर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष के डी पाटील, सचिव सुभाष शिवाजी पाटील, प्रदीप पाटील, सरदार कोळी, रवींद्र पाटील, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.






