कासोदा येथील रॉयल जिम तर्फे मुखतार अली यांचा सत्कार
कासोदा ता, एरंडोल रजनीकांत पाटील
कासोदा येथील नामवंत पैलवान मुख्तार अली यांची मल्लविद्या महासंघ एरंडोल तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रॉयल जिम तर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी हे होते
मुखतार पैलवान यांचा सत्कार रॉयल जिम चे प्रमुख संचालक अतीक बिल्डर अब्बु दादा शेख बिल्डर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्तार पैलवान यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आमच्या वेळी जिम नव्हते तरी आम्ही फार मेहनत घेतली आता तुम्हाला सराव करण्यासाठी जिम आहे तरी आपण याचा फायदा घ्यावा व आपण आयुष्यात यशस्वी व्हा असे आवाहन केले
अध्यक्षीय भाषणात नूरुद्दीन मुल्लाजी यांनी सांगितले की मुखतार पैलवान यांनी आपले नाव आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे त्यांची उपाध्यक्ष निवड व त्यांनी भूषवलेले पद एम पी मधील देवास केसरी हे पद मिळवले आहे आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यात यशस्वी विवाह असे आव्हान केले
प्रस्ताविक व सूत्रसंचालन मुजाहिद खान सर यांनी केले.
कार्यक्रमाला शेख निसार, मुजफ्फर अली ,निलेश अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रम लॉक डाऊन असल्याने सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम पार पडला.






