आवास बहुउद्देशीय संस्थेला अमळनेर नगरपरिषदेने दिली कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारची अधिकृत परवानगी
रजनीकांत पाटील
अमळनेर येथिल सेवाभावी कार्य करणारी आवास बहुउद्देशीय संस्थेला अमळनेर नगर परिषदेतर्फे कोरोना पोसिटिव्ह व संशयित रुग्णांच्या मृत्यूनंतर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे लेखी परवानगी पत्र अखेर नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अदा केले.
अमळनेर शहरातील कोरोना पोसिटिव्ह अथवा कोरोना संशयित रुग्णाच्या मृत्यूनंतर कोणतेही मानधन न घेता स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रेताची अवहेलना न होऊ देता आवास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हे रुग्णाच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्याचे पवित्र कार्य करीत होते.
मात्र त्यांना कोणतेही अधिकृत असे आदेश संबंधित यंत्रणेकडून अथवा प्रशासनाकडून प्राप्त नव्हते.नगरपरिषदेच्यावतीने या कामी दोनवेळा काढलेले टेंडर भीतीमुळे कोणीही भरलेले नव्हते.अश्यातच मोफत अंत्यसंस्काराचे काम करणारे मुस्लिम युवकांनी या कामी पुढाकात घेतल्याने नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी लेखी परवानगी पत्र अध्यक्ष अश्फाक शेख,उपाध्यक्ष गुलाम नबी पठाण, सैय्यद अहमदअली सैय्यद, सचिव नावेद अहमद शेख मूशिर, अमजद अली शहा,जमालोद्दीन व सदस्यांच्या उपस्थितीत सुपूर्द केले.तसेच अंत्यसंस्कार करतेवेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने पी पी ई किट वैद्यकीय अधिकारी, ग्रामिण रुग्णालय व संबंधित हॊस्पिटल यांचेमार्फत पुरविले जातील असेही सदर पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
आवास संस्थेच्या मुस्लिम युवकांच्या सामाजिक कार्याबद्दल वृत्तपत्र व न्यूजपोर्टल यांनी गेल्या काही दिवसांपासून वृत्तांत समाजासमोर आणल्याने नगरपरिषदेने त्यांच्या कार्याची अखेर दखल घेतली आहे.
आवास चा कोरोना योध्दा म्हणून गौरव
कोरोना बाधित रुग्णांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या आवास बहुउद्देशीय संस्था च्या टीमला अमळनेर भाजपा च्या वतीनेही आज “कोविड 19 कोरोना योध्दा प्रमाणपत्र” जळगांव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार राजु मामा भोळे व मा विधान परिषद सदस्य स्मिता ताई वाघ ,महिला नेत्या ऍड ललिताताई पाटिल आदि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आवास च्या सामाजिक कार्यकर्त्यांना विमा संरक्षण द्या!
अमळनेर येथील कोरोना बाधित व संशयित रुग्णांचे अंत्यसंस्कार रुग्णांच्या धर्मानुसार विधिवत करणाऱ्या सामाजिक सलोखा जपत पवित्र कार्य करीत स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आवास बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक युवा कार्यकर्त्यांना
आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना योद्धे असलेल्या विमा संरक्षित कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरपरिषदेच्यावतीने अथवा संबंधित महसूल प्रशासनाच्यावतीने प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशी जाहीर मागणी शिव बहुउद्देशीय प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केली आहे.






