शहरातील आवास सामाजिक सेवा भावी संस्था सरसावली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अंत्यसंस्कार साठी…अमळनेर प्रतिनिधी राकेश पाटीलयेथील सामाजिक सेवाभावी आवास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोरोना बाधित मृत्यू रूग्णांना विविध धर्माच्या नुसार मोफत अंत्यसंस्कार करत आहे.तालुका सह शहरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे कोरोना बाधित रुग्णाची संख्या दोन हजाराने पार झाली आहे. तसेच तालुक्यातील कोरोना पाजिटिव मृत्यूंची संख्या साठच्या वर झाली आहे त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संपर्कात न येण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहेत.
त्यामुळे मृत्यू रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांची फरफट होते कोरोना चा प्रसार जास्त होऊ नये आणि अवहेलना न होता अंत्यसंस्कार पार पडावेत म्हणून स्वतःच्या जीव धोक्यात घालून आवास बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते यांनी पुढे येत अंत्यसंस्काराचे अतिशय पुण्याचे काम हाती घेतले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास संसर्ग वाढू नये म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी नगरपालिकेवर टाकण्यात आली आहे आरोग्य विभागाचे निरीक्षक युवराज चव्हाण , संतोष बिऱ्हाडे , रउफ शेख मेहतर आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने अंत्यसंस्कार करत आहेत. मात्र दररोज मृत्यूचे प्रमाण वाढले असून पालिका कर्मचारी कोरोनाच्या इतर कामात व्यस्त असल्याने अडचणी येतात म्हणून पालिकेने दोनदा अंत्यसंस्कार करण्यासाठी ठेका देण्याचा निर्णय घेतला आणि दोनदा टेंडर काढले एरवी नगरपालिकेचा ठेका घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते परंतु भीतीपोटी कोणीही सरसावले नाही त्याच वेळी शहरातील मुस्लिम युवकांची आवास बहुउद्देशीय संस्था आता कोणत्याही धर्माच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी सरसावली असून त्यांनी पालिकेला तसे पत्र दिले आहे.फक्त अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींसाठी किट उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
या पथकातील अध्यक्ष अशपाक बशिरोद्दीन शेख , उपाध्यक्ष गुलामनबी पठाण , सैय्यद अहमदअली सैय्यद , सचिव नावेद अहमद शेख मुशीर, अमजद अली शहा, व इतर सदस्यांनी या सामाजिक योगदानाची तयारी दर्शवली असून खाजगी रुग्णालयातील दोन पॉझिटिव्ह रुग्ण आणि ग्रामीण रुग्णालयातील एक संशयित रुग्णाचे अंत्यसंस्कार त्यांनी केले आहेत भीती पोटी नातेवाईक देखील अखेरच्या क्षणी पळ काढत असल्याच्या घटना घडत असताना सामाजिक भान ठेवून मुस्लिम युवक सर्व धर्माच्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठी धावल्याने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे.हे सामाजिक काम सर्वांच्या नशीबात नसतो आमची पूर्ण टीमला या कामासाठी रात्री अपरात्री केंव्हाही कॉल करा सेवेसाठी तत्पर आहोत -आवास संस्था उपाध्यक्ष , गुलामनबी पठाण ,अमळनेरसंपर्क क्रमांकनविद शेख • 9921181888
गुलामनबी पठाण • 9579833063
अशफ़ाक शेख • 9226786682
अहेमद अली सैय्यद • 9890257586






