Erandol

एरंडोल नगर पालिकेची नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाई करीत केली मोठी दंड वसुली.

एरंडोल नगर पालिकेची नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाई करीत केली मोठी दंड वसुली.

रजनीकांत पाटील

एरंडोल नगर पालिकेची नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाई करीत केली मोठी दंड वसुली.
प्रतिनिधी – एरंडोल नगर पालिकेने कोरोना च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाई करीत ९३५००/- रुपयांची वसुली केली आहे.

यात मास्क न वापरल्यामुळे ४१०००/- रु.,दुकानात ५ पेक्षा जास्त नागरिक आढळल्याने ३९०००/- रु.,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ४०००/-रु.,सामाजिक अंतर न पाळणे ९५००/- रु.दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबतीत मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक,दुकानदार व व्यापारी यांनी नियमांचे पालन करावे व कटू प्रसंग टाळावा.कोरोणाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक असल्यास घराच्या बाहेर पडावे,मास्क लावणे,सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे,सामाजिक अंतर पाळणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना तब्येत दाखवा अशा सुचना शहरातील नागरिकांना केल्या आहेत.

सदर उपक्रमात मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक संजय धमाळ,क्षेत्रीय अधिकारी एस.आर.ठाकुर,डॉ.योगेश सुकटे, भुषण महाजन,रघुनाथ महाजन,अशोक मोरे,वैभव पाटील,आशिष परदेशी,प्रकाश सुर्यवंशी,गौरव महाजन,लक्ष्मण ठाकुर यांचे पथक परिश्रम घेत आहे.
फोटो ओळी – एरंडोल येथे दुकानावर कारवाई करताना कार्यालयीन अधिक्षक संजय धमाळ,क्षेत्रीय अधिकारी एस. आर.ठाकुर व नगर पालिका कर्मचारी तथा पोलीस दलाचे कर्मचारी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button