युवकमित्र परिवारातर्फे अमळनेर एसटी आगारात फेस शिल्ड वाटप
रजनीकांत पाटील
अमळनेर- कोरोनाच्या धर्तीवर एसटी महामंडळामार्फत काही प्रमाणात बसे फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.चालक वाहक यांना सुरक्षितता म्हणून युवकमित्र परिवार,महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत’कोविड फेस शिल्ड भेट देण्यात आले.अमळनेर डेपोचे लेखाधिकारी पी.सी.महाजन यांच्याकडे युवकमित्र परिवाराचे शुभम पाटील,प्रवीण महाजन,पारोळा महसूल विभागाचे जगदीश पाटील यांनी शंभर फेस शिल्ड सुपूर्द केले.यावेळी टॅक्सी चालक मालक यांनाही फेस शिल्ड वाटप करण्यात आले.व सर्व चालक वाहकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
नारायणगाव आगाराचे माजी एसटी कर्मचारी प्रवीण महाजन,पुणेकर यांच्या संकल्पनेतुन कार्यक्रम राबविण्यात आला.युवकमित्र परिवारामार्फत आतापर्यंत असंख्य कुटूंबांना कोविड संकटकाळात गरजूंना किराणा,धान्य, मास्क व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.फेस शिल्ड सुपूर्द कार्यक्रमप्रसंगी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष डी. एस.वानखेडे,वाहक के.व्ही.महाजन,तुषार सांळूखे,आर.डी सिद्धापुरे,ए.आर.पठाण हे उपस्थित होते.






