Akkalkot

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड यांची कडक कारवाई

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड यांची कडक कारवाई

प्रतिनिधी कृष्णा यादव अक्कलकोट

दि.20:- दिनांक 18 ऑगस्ट 2020 रोजी बायपास रोडवरील मंगरुळे हायस्कूल , अक्कलकोट येथे विना क्रमांकाचा एक टेम्पो अवैध वाळू वाहतूक करीत असताना अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड यांनी पाठलाग करून सदर टेम्पो ताब्यात घेऊन तलाठी श्री एन के मुजावर , तलाठी श्री चोरमुले यांच्यासमवेत सदर वाहन तहसील कार्यालय अक्कलकोट येथील आवारात लावण्यात आले. सदर अवैध वाळू वाहतूक प्रकरणी सदर टेम्पो मालकांकडून रक्कम रुपये 1 लाख 36 हजार चारशे रुपये इतक्‍या रकमेचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

तसेच दुसऱ्या कारवाईत दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी महसूल नायब तहसीलदार श्री संजय राऊत व मंडळाधिकारी तडवळ श्री मनोज निंबाळकर, मंडळ अधिकारी श्री गायकवाड, तलाठी श्री राठोड कुमठे तसेच संबंधित कोतवाल पोलीस पाटील यांनी मौजे कुमठे येथील सीना नदी पत्रातील अवैध वाळू वाहतूक करणेकामी वाळू उपसा करणारी एक यांत्रिक बोट जाळून नष्ट करण्यात आले आहे या कारवाईची माहिती अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मरोड यांनी एका प्रेस नोटद्वारे दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button