Amalner

आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांना बिहारच्या सामाजिक संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार

आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांना बिहारच्या सामाजिक संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार

रजनीकांत पाटील

अमळनेर- नगर परिषद अमळनेर येथील आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांना प्रगती आदर्श सेवा केंद्र समस्तीपुर बिहार या संस्थेने कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत रात्रंदिवस प्रतिबंधक क्षेत्रात कार्य करून जनतेच्या आरोग्यासाठी श्री चव्हाण झटत आहेत संपूर्ण शहरात कोरोनाचा वाढता धोका निर्माण झाला असून अश्या परिस्थिती मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन शहरातील परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली आहे रुग्णांची काळजी ते मयताचा अंतिम विधी हे सारे कार्य अविरत करणारे युवराज चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत आदर्श सेवा केंद्र समस्तीपुर बिहार यांनी त्यांचा गौरव केला आहे
एक डिजिटल प्रमाणपत्र पाठवून संस्थेचे सचिव संजय कुमार बबलू यांनी गौरव केला असून कोरोना नंतर च्या काळात सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे नमूद केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button