बोरघर येथील जीओ टावर बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित
पुणे – प्रतिनीधी ( दिलीप आंबवणे )
आदिवासी भागात बोरघर ( ता आंबेगाव ) याठिकाणी जिओ कंपनीने टावर बसवलेले आहेत मात्र हे टावर अद्यापपर्यंत सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नाही ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिओ कंपनीला जर टावर चालू करायचे नव्हते तर मग कशाला बसवले असा प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे बसवलेली टावर तात्काळ चालू करा अन्यथा काढून टाका असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शिक्षणा पासून वंचित असलेल्या आदिवासी मुलं हे फक्त इंटरनेट सुविधा नसल्यामुळे होत आहे. अनेक दिवसांपासून जिओ कंपन्यांनी अशा अनेक ठिकाणी आदिवासी भागात टावर बसलेले आहेत मात्र ते चालू केले नाहीत मग बसण्या मागचा हेतू काय होता जर का टावर सुरू झाले असते तर तेथील आदिवासी मुलांना ऑनलाईन शिक्षण आले असते. आज पर्यंत आदिवासी भागात ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे असे लक्षात देत आहे असे पालकांचे म्हणणे आहे. आज दोन महिने झाले ऑनलाइन शाळा सुरू होऊन पण आमची मुलं ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिली आहेत याला कारणीभूत कोण आहे शहरातील मुले ही रोज अभ्यास करतात त्यांना ऑनलाइन यूट्यूब च्या द्वारे व्हिडिओ बनवून पाठवले जातात पण आमच्या मुलांचं काय. ग्रामीण भागातल्या मुलांना शिकायचं नाही का ग्रामीण भागासाठी शिक्षकांची जबाबदारी आहे की नाही याचा विचार कधी शासन करणार आहे. ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या पाहिजेत नाहीतर आमच्या मुलांचे शैक्षणिक वर्षाचे नुसकान होणार आहे. त्यामध्ये पावसाळा असल्याने लाईट वेळ नसते त्या टीव्हीला टिलीमीली कार्यक्रम सुरू झाला आहे तेवढ्यावरच आमची मुले आज अभ्यास करत आहेत तरी तात्काळ जीओ टावर सुरू करा किंवा शाळा सुरू करा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
यापूर्वीसुद्धा ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रस्त्याच्या कडेकडेने इंटरनेट केबल ची लाईन ओढली आहे तीसुद्धा ग्रामपंचायतीला इंटरनेट चालू केले नाही मग हा एवढा मोठा लाखो रूपायचा खर्च कशासाठी केला जातो फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी हा खर्च होत आहे का योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना झालाच नाही आज पर्यंत या योजना का राबवल्या जातात असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे.






