शिरसाळे येथील २१ वर्षीय तरुणाची झाडाला गळफास लावून आत्महत्या
रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यातील शिरसाळे येथील एका २१ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी फारुख खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, काल दि. ५ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्यादी घरी असताना गावातील शेतकरी जगन्नाथ पाटील हे आले आणि त्यांनी सांगितले की, त्यांच्या शेतात कोणीतरी गळफास लावून घेतला आहे. त्यांनतर फिर्यादी व शेतकरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी केली असता गावाला लागून असलेल्या स्मशाभूमीच्या समोरील जगन्नाथ पाटील यांच्या शेतात साहिल भिकण खाटीक (वय २१, रा. शिरसाळे) याने चिंचेच्या झाडाला गळफास घेतला होता. त्यावेळीच तो मयत झालेला होता. त्यानंतर खाजगी वाहनाने त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सदर तरुण हा १२ वी पास झालेला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आहेत.






