अमळनेर तालुक्यात आढळले 48 कोरोना बाधित… एकूण बाधित संख्या 819, तर 546 झाले कोरोनामुक्त..
रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यात तब्बल 48 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
या रुग्णात जानवे येथील घेण्यात आलेल्या कॅम्प मधील 18, अमळगाव येथील 3, नीम येथील 1, मारवड येथील 3, मंगरूळ येथील 1, केशव नगर येथील 1, विद्या विहार कॉलनी येथील एक 1, संभाजी नगर येथील 1, पातोंडा येथील 1, व हाय रिस्क 18 असे एकूण 48 बाधित आहेत. एकूण बाधित रुग्णांची संख्या 819 झाली असली तरी त्यातील 546 रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून 227 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.






