Patur

बुलढाणा जिल्हा नांदुरा येथील घटनेचे अकोला जिल्ह्यात तीव्र पडसाद

बुलढाणा जिल्हा नांदुरा येथील घटनेचे अकोला जिल्ह्यात तीव्र पडसाद

पातुर प्रतिनिधी विलास धोंगडे

पातूर बुलढाणा जिल्हा नांदुरा येथील एका तीन वर्षीय बालिकेवर दिनांक 24/07/ 2020 रोजी एका 24 वर्षीय नराधमाने (आरोपी नैनेश लक्ष्मणदास रामचंदानी) याने पशु चिकित्सालयाच्या जागेमध्ये बलात्कार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला हि बालिका सामान्य रुग्णालय अकोला येथे मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे त्या प्रकरणात महाराष्ट्रातील समस्तआदिवासी समाजाच्या भावना अत्यंत गंभीर दुखावल्या असून आम्ही तीव्र निषेध करत आहो अशा निवेदनाद्वारे पातुर तहसीलदार यांना निवेदन देऊन या नराधमाला पास्को कायद्याअंतर्गत कडक कारवाई करून फाशीची शिक्षा व्हावी व त्याशिवाय समाजातील अशी नीच प्रवृत्ती संपणार नाही अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून बिरसा क्रांतीदल तालुक्याच्या वतीने करण्यात आली यावेळी बिरसा क्रांती दल तालुकाध्यक्ष रामचंद्र लोखंडे, ता. उपाध्यक्ष विलास धोंगडे, प.स. सदस्य शाम ठाकरे, गुलाब वानखडे,
गोपाल ठाकरे, अजित आलाट, पत्रकार व टिव्ही चैनल रिपोर्ट राम वाढी , किरण कुमार निमकंडे आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button