Pune

असाणे गावातील मुकबधिर अक्षय गभाले यांचे 10 वी ला 75 टक्के मिळाल्याने कौतुक

असाणे गावातील मुकबधिर अक्षय गभाले यांचे 10 वी ला 75 टक्के मिळाल्याने कौतुक

पुणे – प्रतिनीधी दिलीप आंबवणे

विश्रांतवाडी येथील सी.आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालय टिंगरेनगर या शाळेतील अक्षय गणपत गभाले यांनी इयत्ता 10 वी ला 75.60 टक्के गुण मिळवले आहेत.
मुळगाव असाणे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील असून अक्षय हा पुण्यामध्ये शिक्षण घेत होता. लहानपणापासून अतिशय हुशार असलेला अक्षय मूकबधिर असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्याला पुण्यामध्ये शिक्षणासाठी आईवडिलांनी पाठवले परिस्थिती गरीब असलेला अक्षय मात्र खचून न जाता मोठा भाऊ शिवाजी यांनी वेळोवेळी अक्षयच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. गावातून अक्षय चे कौतुक होत आहे. तसेच दहावी नंतर पुढील शिक्षण काय करता येईल की अकरावी-बारावी हे शिक्षण घेतलं पाहिजे व्यवसायिक शिक्षण दिले पाहिजे याबद्दल शिवाजी यांनी आपल्या भावासाठी योग्य मार्गदर्शन घेत आहे.

अकरावी बारावी साठी फक्त मूकबधिर मुलांना विश्रांतवाडी मध्ये एकमेव कॉलेज आहे. पण व्यवसायिक शिक्षण दिले तर अक्षय स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो असा विश्वास शिवाजी गभाले यांना आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button