श्री सुरेश दादा यांची किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
नूरखान
निंभोरा ता. अमळनेर येथील कृषिभूषण, दादा साहेब सुरेश पीरण पाटील यांची, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसकडून “जळगाव जिल्हा किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष “पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती पत्र, जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट भैय्यासाहेब संदीप जी पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार श्री नाना पटोले साहेब असून महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री पराग पाष्टे साहेब आहेत.
श्री सुरेश पिरन पाटील हे अमळनेर तालुक्यातील प्रगतिशील, मोठे शेतकरी असून, महाराष्ट्र शासनाने त्यांना “कृषिभूषण” पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच आरसीएफ कंपनी मुंबईकडून त्यांना “प्रगतिशील किसान” पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. सध्या ते अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून, अमळनेर तालुका शेतकी संघाचे माजी चेअरमन आहेत. भरपूर शेत जमीन असल्याने फळबाग, बागायती अशा विविध पिकांवर त्यांचे नेहमी संशोधन सुरू असते. व त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होतो ,म्हणून श्री शांताराम बापू तसेच अमळनेर तालुका अध्यक्ष श्री गोकुळ बोरसे (आबा) यांनी योग्य व्यक्तीला न्याय मिळाल्याचे वक्तव्य केले. चोपडा येथे सदर नियुक्तीपत्र देताना, महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुलोचना वाघ, प्राध्यापक श्री सुभाष पाटील, एडवोकेट गिरीश पाटील ,अमळनेर तालुका रेशनिंग कमिटीचे अध्यक्ष श्री भागवत सूर्यवंशी, कुंदन पाटील, जिल्हा प्रशासकीय सरचिटणीस( काँग्रेस) बापूसाहेब श्री अजबराव पाटील हे उपस्थित होते.सर्व प्रेमी मंडळी कडून दादांचं अभिनंदन होत आहे.






