आदीवासी महिलेचा विनयभंग…. अमळनेर पो.स्टेला गुन्हा दाखल
प्रतिनिधी नूरखान
अमळनेर पिळोदे येथील एक आदिवासी पारधी समाजाची महिलेचा विनयभंग व
जातीवरून शिवीगाळ केल्यामुळे विनयभंग व अट्रोसिटी Act नुसार H
गुन्हा दाखल दि.22/7/2020 रोजी पीळोदे येथील एका आदिवासी पारधी समाजाची विधवा सोबत आरोपी अर्जुन बाबुराव निकुंभ, युवराज बाबुराव निकुंभ, सुशीला युवराज निकुंभ , अरुणा अर्जुन निकुंभ है फिर्यादीच्या घरासमोर आलेत व फिर्यादीला म्हणाले कि, तुम्ही ग्रामपंचायतीच्या जागेवर ठेवलेले लाकडे उचलून घ्या असे बोलल्याने फिर्यादी यांनी आरोपींना सांगितले कि, आम्ही खूप दिवसापासून सदर जागेवर लाकडे ठेवत आहे मी लाकडे उचलणार नाही असे आरोपींना बोलल्याने त्याच्या त्यांना राग वाटून वरील चार हि लोकांनी फिर्यादीला जातीवरून शिवीगाळ केली, तसेच हि जागा तुमच्या बापाची आहे का हाराम खोरांनो,जर हि लाकडे तुम्ही आताच नाही उचलली तर तुम्ही खालच्या जातीचे पारधोल्ल्यांनो आम्ही सर्व तुमच्या घरात घुसून तुमचे हातपाय तोडून टाकू,साले चोर पारधोल्ल्यांनो साले दोन कवडीच्या जातीचे पारधी तुम्ही आमचे काही एक उपटून घेणार नाही,व तुम्ही आमचे काही एक वाकड करू शकत नाही असे बोलून युबराज बाबुराव निकुंभानव अर्जुन बाबुराव निकुंभ यांनी फिर्यादीचा उजवा हात धरून त्यांचा अंगावर ओढले व फिर्यादीच्या छातीला हात लाऊन मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. आरोपींविरोधात भा.द.वि.कलम ३५४, ५०४, ५०६, Atrocity Act कलम [१][7] 3 [२][5] नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तर्फे एड साजिद शाह यांनी काम पाहिले.






