निंभोरा पोलिसांनी मोटर सायकल चोरास पकडले
संदीप कोळी
निंभोरा बु।। ता रावेर येथील दि२२रोजी रात्रि मोटर सायकल हीरो सुपर स्लेंडर MH.19.CA 1053 ही युवराज भास्कर चौधरी यांच्या मालकीची निंभोरा बस स्टँन्ड परिसरातील त्यांच्या घरांजवळून चोरी गेली होती याबाबत चौधरी यांनी निंभोरा पोलिस स्टेशन तक्रार दिली असता सपोनि महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाली सहा फौजदार मकसूद शेख,पो ना. अनिल साळूंखे याबाबत अधिक तपास केला असता व माहिती मिळाल्याने त्यांनी ही मोटर सायकल विटवा ता रावेर येथील अमोल भादु मनोरे वय २४ यांच्या कडे सापडल्याने पोलिसांनी त्यास अटक करून गाड़ी ताब्यात घेतली आहे .याबाबत निंभोरा पोलिसात गु. र. नं.३०/२०२० भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.या आधी काही दिवसापूर्वी सहा. फौजदार मकसूद शेख यांनी चोरिचा प्रकार उघड़किस आणला आहे.






