नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या जिल्हा समनव्यकपदी युवावक्ता सारांश सोनार यांची निवड ..
खासदार उन्मेष पाटील यांनी केले अभिनंदन
नूरखान
अमळनेर येथील युवा वक्ते व धुळे विधी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी सारांश धनंजय सोनार यांची नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया तथा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या (NYCI) जळगाव जिल्हा समन्वयकपदी तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी विशेष पत्र देऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीस सदिच्छा दिल्यात.

महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. त्रिवेनीकुमार कोरे , जिल्हाध्यक्ष तेजस पाटील यांनी ही निवड केली असून सारांश सोनार कामात सक्रिय झाले आहेत.
युवकांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या या देशव्यापी संस्थेचे समन्वयक झालेल्या सारांश सोनार यांचे डॉ जी एम पाटील, प्रा वैभव सबनीस, प्रा रमेश माने, प्रा नितीन पाटील, डीगंबर महाले, प्रा लीलाधर पाटील, सतीश देशमुख, प्रा प्रकाश धर्माधिकारी, विक्रांत पाटील, दिलीप सोनवणे, श्याम सोनार, रवींद्र विसपुते, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, गणेश खरोटे, संजय सोनार विनोद राऊळ, अनिल चौधरी, सुवर्णकार समाज तसेच अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातून संपुर्ण देशातील राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत . त्या साठी अमळनेर तालुका कार्यकारणी गठीत करून घोषित करणार आहेत असे सारांश सोनार यांनी सांगितले.






