Erandol

एरंडोल येथे लोकराज्य 24 न्यूज चॅनेलचे लोकार्पण व सन्मान सोहळा संपन्न..

एरंडोल येथे लोकराज्य 24 न्यूज चॅनेलचे लोकार्पण व सन्मान सोहळा संपन्न..

एरंडोल येथे लोकराज्य 24 न्यूज चॅनेलचे लोकार्पण व सन्मान सोहळा संपन्न..

एरंडोल – प्रतिनिधी विक्की खोकरे
येथे लोकराज्य 24 तास न्यूज चैनल व मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकराज्य 24 तास न्यूज चैनलच्या उद्घाटन लोकार्पण समारंभ व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते न्युज चॅनलचे उद्घाटन शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन हे होते 
आपल्या उद्घाटनाच्या भाषणात रमेश परदेशी यांनी युवकांनी युवराज उर्फ विक्की खोकरे यांच्या आदर्श घ्यावे हे सांगताच एक धडपडणारा करून काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे युवराज खोकरे असून सेवाभाव हा त्याच्या स्थायिभाव असल्याचे मत व्यक्त केले 
इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल खरेदी केले जातात ह्या पार्श्वभूमीवर लोकराज्य 24 तास न्यूज चॅनल स्थानिक बातम्यांना योग्य प्रसिद्धी देऊन नागरिकांच्या समस्याच्या वाचा फोडण्यास समर्थक ठरेल असा विश्वास माजी नगरसेवक विजय महाजन व माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी व्यक्त केला
 यावेळी  सामाजिक,वैद्यकीय, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गुणवंतांच्या लोकराज्य 24 तास व मानवसेवा संस्थेमार्फत सन्मानित करण्यात आले त्यावेळी डॉक्टर राहुल वाघ अॅड विलास मोरे ,सूनील चौधरी ,विजय पाटील ,डॉक्टर किरण पाटील यांचा सन्मान करण्यात आले तसेच सन्मानार्थ मनोगत व्यक्त करताना अॅड विलास मोरे यांनी भरकटलेल्या तरुणाईसाठी युवराज खोकरे यांचे काम दिपस्तंभ असल्याचे मत व्यक्त केले ,
यावेळी रवींद्र महाजन ,शालिक भाऊ गायकवाड ,डॉक्टर संजय कुमार सोनवणे एडवोकेट अरुण देशमुख ,यांनी समयोचित भाषणे झाली याप्रसंगी युवराज खोकरे व त्यांचे वडील फकीरा खोकरे यांना देखील एरंडोल नागरिकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी नगरसेवक डॉक्टर डॉ सुरेश पाटील ,नगरसेवक कुणाल महाजन ,विनोद गवई,डॉक्टर आर बी पाटील ,अजय साडी सर  डॉक्टर एस टी पाटील, सुरेश महाजन ज्ञानेश्वर मिस्तरी ,पंकज पाटील ,डॉक्टर मुकेश चौधरी विशाल सोनार इत्यादी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
 अमोल चिमणराव पाटील ,किशोर निबांडकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्तार शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आर एस पाटील यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button