आखाडा विधानसभेचा…..
हाताला काम आणि शेतीला पाणी….आमदार शिरिषदादा चौधरी यांनी दिलेला शब्द खरा करत बांधली विकास कामांची मोट…..
महाराष्ट्र मराठी 7 मांडणार गेल्या पाच विकास कामांचा आलेख आणि करणार तुलना गेल्या पंचवीस वर्षातील कामांशी….
दिलेला शब्द न शब्द पाळला…पात्र आहेत जनतेच्या विश्वासाला म्हणूनच तोड नाही या दमदार आमदाराला…
अमळनेर नुकतीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सम्पूर्ण महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झालीआहे.या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षात पदसिद्ध नेत्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनता विचारात घेणार आहे. आणि त्यानुसारच आपला पुढील नेता आणि आमदार कोण असणार हे ठरविणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची धामधूम सुरू झाली आहे. यात एकमेकांवर टीका करणे,श्रेय घेणे,राजकीय डावपेच आखणे,मतदारांची दिशाभूल करून त्यांना फसविणे असे प्रकार सुरू आहेत परंतु मतदार राजा आता जागृत झाला आहे. विकास कामे विचारात घेऊनच मागील 20 वर्षे आणि मागची पंच वार्षिक यात झालेली कामे याची तुलना मतदार नक्कीच करणार आहेत. इतरांनी केलेल्या दिशा भूलला न भाळता योग्य आणि विकास कामांची आस असलेल्या प्रतिनिधी लाच निवडून देतील यात कोणतीही शंका नाही….
लवकरच सम्पूर्ण अमळनेर तालुक्यातील विकास कामे घेऊन येत आहोत….
दिलेला शब्द न शब्द पाळला…पात्र आहेत जनतेच्या विश्वासाला म्हणूनच तोड नाही या दमदार आमदाराला…









