?️ अमळनेर पंचायत समितीचे प्रवेशद्वार बनले स्विमिंग पूल..प्रवेशद्वार वरील कचऱ्याची कुंडी रोगाचे माहेरघरअमळनेर येथील पंचायत समितीच्या प्रवेशद्वार स्विमिंग पूल बनले आहे.अमळनेर पंचायत समितीच्या प्रवेशद्वार जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या पाण्यातून च उड्या मारत लोकांना ये जा करावी लागत आहे. अमळनेर पंचायत समिती त ग्रामीण भागातून शेकडो लोकांचे जाणे येणे असते.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या आवारातील हे साचलेले पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. पंचायत समिती त जाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
याच प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला दोन कचरा डबे आहेत ह्या कचरा पेट्यां मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यात डास ,किडे आणि इतर किटकांनी आपले घर बनवले आहे. शेकडो नागरिक येथुन ये जा करतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आता प्रशासकीय पातळीवर कोरोना हटाव मोहिम राबविणाऱ्या प्रशासनाचे स्वतः च्या च घरा कडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. लोकांवर दंडात्मक कार्यवाही करणाऱ्या प्रशासनावर कोण कार्यवाही करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार प्रशासनास नाही याची जाणीव प्रशासनाने ठेवावी.






