?️ तहसीलदार मिलिंद वाघ यांचे जनतेस बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार
दि.०७/०७/२०२० चे सकाळी ०५.००
वाजेपासून ते दि. १३/०७/२०२० चे रात्री
१२.०० वाजेपावेतो कडक लॉकडाउन जाहीर
करण्यात आले होते. उद्या दि. १४/०७/२०२०
रोजी अमळनेर नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठ, दुकाने खुली होणार आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता
नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अमळनेर चे कर्तव्य दक्ष तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सर्व जनतेला आव्हान केले आहे की,मंगळवारी
खरेदीसाठी गर्दी करू नये.आवश्यक असेल तेंव्हाच घराबाहेर पडावे घरातच थांबावे.संचार बंदी नियम लागू असून कायदेशीर कारवाई नियमांचे उल्लंघन केल्यास होणारच आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व दुकानदारांनी अनावश्यक गर्दी होणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.तसेच अमळनेर नगरपालिका क्षेत्रातील किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांनी देखील आपल्या दुकानासमोर अनावश्यक
गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी एखाद्या किरकोळ अथवा घाऊक दुकानासमोर
अनावश्यक गर्दी झालेली आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असेही त्यांनी आवाहन केले आहे.
अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस कळविण्यात येते की,बाजारामध्ये
अनावश्यक गर्दी करू नका, आवश्यक असल्यास घराबाहेर पडा अन्यथा घरातच राहुन प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ
केले आहे.






