लेखाजोखा कार्याचा…
आखाडा विधानसभेचा….
पाचच वर्षात आपल्या उत्तम व्यक्तिमत्वामुळे अमळनेरकरांना लावला जीव…केलं आपलंसं …म्हणूनच उसळते गर्दी.. लहान थोर सर्वच दादांचे दर्दी….
अमळनेर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच लोक प्रतिनिधी जोशात रिंगणात उतरले आहेत.अमळनेर विधानसभा मतदारसंघात अजून तिकिटाचे चित्र स्पष्ट नसले तरी लोकां पर्यंत पोहचण्यात मात्र विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांनी आघाडी घेतली आहे. गावा गावातील त्यांच्या बैठका आणि त्यांना मिळणारा जोरदार प्रतिसाद विरोधकांना अस्वस्थ करणारा आहे .इतर उमेदवारांच्या तुलनेत सोशल मीडियावर देखील जोरदार सुरुवात झाली आहे.
मागील पंचवार्षिक मध्ये जो वचननामा प्रसिद्ध केला आहे त्यातील 80% काम या नंदसुपुत्राने पूर्ण केले आहेत.
म्हणूनच ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचा पाठिंबा पूर्णपणे त्यांना मिळत आहे.
??पाडळसरे धरण…
विरोधक पाडळसरे धरण अपूर्ण राहिले याला नंदकुमार यांना जबाबदार धरूच शकत नाही कारण गेल्या 20 वर्षातील लोक प्रतिनिधी नी काय बोंब पाडली हाही
प्रश्न आहेच जर पाच वर्षांचा हिशोब मागत आहात तर गेल्या 20 वर्षाचाही हिशोब जनता पाहणार आहे.हे समजण्या इतकी जनता हुशार नक्कीच आहे.गेल्या 20 वर्षात लोक प्रतिनिधींनी काहीच न केल्या मुळे आज धरणाची कॅश व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात वाढली आहे तरीही विद्यमान आमदार यांनी सातत्याने पाठपुरावा करून धरणाचा विषय अधिवेशने,जलसंपदा मंत्री, आणि शासनाकडे सातत्याने लावून धरला त्यामुळे नुकतेच नाबार्ड कडून कर्ज मंजूर देखील झाले आहे.
??चोपडा रेल्वे गेट….
अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोक प्रतिनिधींनी दुर्लक्षित केलेला चोपडा रेल्वे गेट वरील उड्डाणपूल मंजूर करून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथे
होणारी वाहतुकीची कोंडी आणि चोपडा,जळोद कडे जाणाऱ्या प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे. हे खूप मोठं अमलनेरकरांच्या स्वप्नातील कार्य कार्यसम्राट दमदार नंदसुपुत्र यांनी केले आहे.
??बोरी लगतचे दोन पूल…
पैलाड येथे जाण्यासाठी बोरी नदी छोटा पूल ओलांडून जाण्यासाठी नागरिकांना फार मोठ्या वाहतूक आणि अडचणी येत होती त्याअनुषंगाने बोरी नदीवरील दोन्ही पूल पूर्ण होऊन नागरिकांची समस्या सुटली आहे
??भव्य पुतळे…
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पुतळे शहरात निर्माण करून त्यांच्या बद्दल ऋण फेडले
??खळेश्वर स्मशानभूमी
खळे श्वर,आमलेश्वर नगर भाग हा कायमच विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला आहे.या भागाकडे जातीने लक्ष देऊन येथील अनेक अडचणी सोडवून मुख्य अडचण स्मशानभूमी ची होती तीही पूर्ण करण्यात आली.
??आदिवासी क्रीडा संकुल…
कायमच तालुक्यात आदिवासी बांधवाना कमी लेखल गेलं आहे.आजपर्यंत कोणत्याही लोक प्रतिनिधी ने आदिवासी प्रश्नांना वाचा फोडली नाही फक्त अशिक्षित आदिवासी बांधवांचा फायद्या साठी उपयोग करून घेतला.सुशिक्षित आदिवासी स्थानिक लोक प्रतिनिधींना चालत नाहीत या पार्श्वभूमीवर नंदसुपुत्र यांचा अनुभव मात्र वेगळा ठरला आहे. सर्व आदिवासी च्या समस्यां तर जाणूनच घेतल्या त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेली शारीरिक क्षमता त्यांनी ओळखून पाच कोटींचे आदिवासी क्रीडा संकुल उभारण्याचा पाठपुरावा करत आहेत. याशिवाय गावागावात
देवमढ्या बांधण्यात आल्या आहेत.म्हणूनच पहिल्यांदा तालुक्यातील आदिवासी बांधव नंदसुपुत्रांना आपला आदिवासी आमदार संबोधित करतात.
??शिवाजी उद्यान सुशोभीकरण
शहराच्या मध्यभागी असलेले सर्वात जुने शिवाजी उद्यान हा नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय होता. अत्यन्त वाईट अवस्थेत हे उद्यान वर्षानुवर्षे पडलेले होते या उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करून शहरातील नागरिकांना सकाळी व्यायाम आणि लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य मध्यवर्ती ठिकाण उपलब्ध करून दिले.
विरोधकांनी देखील मान्य केले आहे की सर्वात जास्त कामे गेल्या पंचवार्षिक मध्ये झाली अजून काय?????
अमळनेरकरांनो ही विकास कामाची यादी खूप मोठी आहे आणि आपण ती क्रमशः जाहीर करणार आहोत…….
क्रमशः








