आखाडा विधानसभेचा…..
अमळनेर येथे आचारसंहितेचा भंग…. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भाईदास पाटील यांच्या सह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल..…
अमळनेर शरद पवार यांच्या वर झालेल्या ईडी च्या गुन्ह्या संदर्भात त्यांच्या समर्थनार्थ
अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून निवेदन प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले.परंतु आचारसंहिता सुरू असल्याने अनिल भाईदास पाटील यांच्यासह २० ते २५ जणांवर आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्याने जिल्हाधिकाऱयांनी आचारसंहिता जाहीर झाल्यापासून प्रतिबंधात्मक १४४ (१)(२)(३) कलम लागू केले आहे
या दरम्यान अनिल भाईदास पाटील व इतर २० ते २५ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे घड्याळ चिन्ह असलेले फटके गळ्यात घालून मोर्चा काढून प्रांताधिकारी सीमा आहिरे याना निवेदन दिले. याप्रकरणी भरारी पथक प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षक अविनाश शिवाजीराव खैरनार यांनी अमळनेर पोलिसात आचारसंहिता भंग झाल्याची फिर्याद दिल्यावरून भादवी कलम १८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे अनिल पाटील व २५ जंणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







